विधानसभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर आमदार Kiran Samant यांची निवड

64
Kiran Samant : विधानसभा 2024-25 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विधानसभेचे अधिवेशन (Assembly session) संपल्यानंतर सरकारने विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर केले असून, यामध्ये लांजा-राजापूर मतदारसंघाचे (Lanja-Rajapur constituency) आमदार किरण सामंत यांची अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिनांक 26 मार्च 2025 रोजी जाहीर केली. (Kiran Samant)

किरण सामंतः लांजा-राजापूरचे लोकप्रिय आमदार
किरण सामंत हे लांजा-राजापूर मतदारसंघाचे (Lanja-Rajapur MLA) प्रतिनिधित्व करणारे आमदार म्हणून ओळखले जातात. या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले आहे. विशेष म्हणजे, किरण सामंत हे सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या (Sindhuratna Samriddhi Yojana) सदस्यपदी देखील कार्यरत असून, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांचे नाव आता विधानमंडळाच्या महत्त्वपूर्ण समित्यांमध्येही सामील झाले आहे.

(हेही वाचा – Nagpur Violence चे बांगलादेशी कनेक्शन? घुसखोर बांगलादेशी नागरिकाला अटक)

अंदाज समिती आणि आश्वासन समितीः महत्त्वाची जबाबदारी
विधानसभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समित्या या सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत आहे की नाही, याची खातरजमा करणाऱ्या महत्त्वाच्या समित्या आहेत. अंदाज समिती ही राज्याच्या अर्थसंकल्पावर बारकाईने नजर ठेवते, तर आश्वासन समिती सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा आढावा घेते. या दोन्ही समित्यांवर आमदार किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.