महिला आमदारांना वेश्या म्हणणे हीच का शिवसेनेची संस्कृती; आमदार मनीषा चौधरी यांचा हल्लाबोल

181

२०-२० वर्षे ज्या महिला आमदार तुमच्यासोबत काम करत होत्या, त्या आमदारांना शिवसेनेचे प्रवक्ते वेश्या म्हणून संबोधित करतात, हीच का शिवसेनेची संस्कृती आहे, अशा शब्दांत भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी हल्लाबोल केला. विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आमदार चौधरी बोलत होत्या.

( हेही वाचा : ‘कोरोना पास’ शिक्का पुसणार; विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिज कोर्स’ उपक्रम)

४० आमदार का सोडून गेले?

आम्ही तुमच्या आमदारांना फोडले नाही. तुमचे ४० आमदार तुम्हाला का सोडून गेले, याचे तुम्ही आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही आमदार चौधरी म्हणाल्या. एका कॅन्सर पीडित महिला आमदारावर त्या खोटे बोलतात असेही म्हटले गेले, त्या महिला आमदाराला काय वाटले असेल. हाच का महिलांचा सन्मान तुम्ही करता का, असा सवाल आमदार चौधरी यांनी केला. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, या मागणीसाठी मी आणि महिला आमदार भारती लव्हेकर मंत्रालयात गेलो, त्यावर आमच्या १४४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, हे चुकीचे आहे, असेही आमदार चौधरी म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.