आमदार Nitesh Rane यांचा राऊतांवर पलटवार; उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचाही आरोप

मला मुख्यमंत्री केले नाही तर मातोश्री मधील अनेक महत्त्वाची माहिती मी बाहेर सांगेल, अशी धमकी संजय राऊत यांनी दिली होती.

163
आमदार Nitesh Rane यांचा राऊतांवर पलटवार; उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचाही आरोप

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणूकीची जय्यत तयारी चालू असून, राज्यात अंतिम पाचव्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र तरी सुद्धा सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकीना अजूनही पूर्णविराम मिळालेला नाहीये. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना चांगलेच धारेवर धरले. इतकेच नाही तर संजय राऊत हे उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ब्लॅकमेल करत होते, असा आरोपही आमदार राणे यांनी केला आहे. 

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने समजावून सांगितले तांत्रिक टप्पे)

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री (Sanjay Raut) होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाला विरोध केला होता, असा पलटवार भारतीय जनता पक्षातील (BJP) कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्याच्याच मंत्रिमंडळातील नेत्यांनी विरोध केला होता, असा दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

(हेही वाचा – Sharad Pawar खोटं बोलत आहेत? संजय राऊत यांनीच खोडला पवारांचा दावा)

आमदार नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रह धरला होता. इतकेच नाहीतर सामनाच्या कार्यालयातून देखील सर्व आमदारांना फोन करून संजय राऊत यांचे नाव घेण्यासाठी सांगण्यात आले होते. असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करत होते, असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला आहे. मला मुख्यमंत्री केले नाही तर मातोश्री मधील अनेक महत्त्वाची माहिती मी बाहेर सांगेल, अशी धमकी संजय राऊत यांनी दिली होती, असा आरोपही आमदार राणे यांनी केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले ?

२०१९ च्या (Election 2019) निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना विरोध करत होते. त्यांच्या नेतृत्वात आपण काम करणार नसल्याचा निरोप भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी मातोश्रीवर पाठवला होता. त्या नंतरच्या काळात महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यावेळी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर आल्यानंतर अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांनी त्यास विरोध केला. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्याला आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.