Ravi Rana : अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीवर रवी राणांचा दावा; दिवाळीत मोठा बॉम्ब फुटले

171

डेंग्यू झाला असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले, तिथे त्यांनी आधी शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीगाटीवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यात आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. रवी राणा यांनी या बैठकीमुळे दिवाळी मोठा बॉम्ब फुटेल, असा दावा केला आहे.

काय म्हणाले रवी राणा? 

शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, अजित पवारांच्या भेटीमुळे शरद पवार 99 टक्के कन्व्हेन्स झाले आहेत. मी आधीच सांगितले होते. दिवाळीच्या आसपास मोठा बॉम्ब फुटू शकतो. मी आधीच दसरा सणाच्या वेळी सांगितले होते की, शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार लवकरच नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. ते भाजप सरकारसोबत येतील. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष संपेल आणि मोठे ताकदवान सरकार या महाष्ट्रात उभे राहील. जे समीकरण दिल्ली स्तरावर चालू आहेत, आजपर्यंत ज्या घटना झालेल्या आहेत त्या अचानक झालेल्या आहेत. अशाचप्रकारे शरद पवार सोबत आले तर सरकारला आणखी ताकद मिळेल. सक्षम मजबूत सरकार महाराष्ट्रात काम करेल, असे रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

(हेही वाचा Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मुंब्रा दौरा; जमाव बंदीचा आदेश; दौरा स्थगित करण्याची विनंती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.