उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सुरू असताना या वादात निवडणूक आयोगाने पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नावच गोठवले आहे. हे सर्व श्रीराम आणि हनुमानांच्या शापामुळे झाले आहे, असे मत आमदार रवी राणांनी व्यक्त केले आहे. हनुमान चालिसेला विरोध केल्याची शिक्षा ठाकरेंना मिळत असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, कोठडीतील मुक्काम वाढला)
काय म्हणाले राणा
उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. हनुमान चालिसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांच्या माध्यमातून जेलमध्ये टाकले. राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला. यासह हनुमान चालिसेचा विरोध केल्यामुळेच आज उद्धव ठाकरेंचे धनुष्यबाण हे चिन्ह श्री राम भगवंतांनी हिसकावून घेतले आहे. उद्धव ठाकरेंना ही शिक्षाच मिळाली आहे. त्यांनी १४ दिवस महिलेला जेलमध्ये टाकले म्हणून श्रीराम भगवंतांनी आणि हनुमान यांनी त्यांना शाप दिला आहे. यामुळेच हे धनुष्यबाण चिन्ह गोठावले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही तीन चिन्ह सादर केली आहेत तर शिंदे गटाकडून उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा ही चिन्ह दिली आहेत. आता या दोन्हीत फक्त गदा आणि मशाल ही दोनच दोघांची वेगळी चिन्ह आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असी तीन नावे सांगितली होती. तर शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावं सुचवली आहेत.
Join Our WhatsApp Community