शाई फेकनंतर गायब असलेले रवी राणा ‘या’ दिवशी प्रकटणार!

131

आमदार रवी राणा यांच्यावर अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्या घटनेच्या दिवसापासून रवी राणा दिल्लीतच आहेत. मात्र सोमवारी, २१ फेब्रुवारी रोजी रवी राणा यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात धाव घेतली. यात दिल्ली न्यायालयाने रवी राणा यांना एका आठवड्याचा ट्रांझिट बेल मिळाली असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली.

रवी राणा अमरावतीत येणार

त्यामुळे रवी राणा यांना एका प्रकारे दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. तर मला व खासदार नवनीत राणा यांना मुख्यमंत्री फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने मी आता उद्या नागपूर न्यायालयात धाव घेऊन या विरोधात दाद मागणार असून ज्या पोलिसांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता उद्या रवी राणा अमरावतीत येणार असल्याची माहिती आहे.

(हेही वाचा ‘लालपरी’चा संप सुरूच! २४ तासांत एसटीच्या विलिनीकरणावर फैसला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.