रवी राणा म्हणतात, मी फडणवीसांचा सच्चा शिपाई

126

अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा यांनी आपल्यावर खोटे आरोप करत आपली बदनामी केल्याची तक्रार कडू यांनी राणा यांच्याविरोधात दाखल केली आहे. या तक्रारीला आता रवी राणा यांनी उत्तर दिले असून रवी राणा कोणत्याही तक्रारींना भीक घालत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. रवी राणा हा कष्टक-यांसाठी काम करणारा माणूस असून तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिपाई आहे, असेही राणा यांनी म्हटले आहे.

मी फडणवीसांचा सच्चा शिपाई

माझ्या विरोधात जे कोणी बोलले असतील, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेले असतील, उपोषण केले असेल त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी अंध,मतिमंद,कष्टकरी,शेतकरी आणि शेतमजूरांसाठी उपोषण करावं. रवी राणावर एक नाही 50जरी गुन्हे दाखल झाले तरी रवी राणा हा सत्तेवर चालणारा माणूस आहे, सत्तेसाठी लढणारा आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिपाई आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार मी चाललो आहे. त्यामुळे कोणी कितीही आरोप केले तरी मी त्यांना भीक घालत नाही, अशी शब्दांत रवी राणा यांनी बच्चू कडूंना प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचाः शेतकऱ्यांनी आधी यांच्यावर आसूड ओढायला हवा, दानवेंचा ठाकरेंवर घणाघात)

त्यांचा जनता हिशोब करेल

माझा कोणाशीही वाद सुरू नाही. सध्या दिवाळीचा सण सुरू आहे.त्यामुळे या सणामध्ये गोर गरीबांसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जे काही आरोप माझ्यावर होत आहेत, जी काही खालच्या स्तरावरची टीका माझ्यावर करण्यात येत आहे, त्यांचा हिशोब जनता नक्की करणार आहे, असेही रवी राणा यांनी यावेळी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.