ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर , त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका आरोप काय?
आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार असून आमदार वायकर यांनी जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यांसंबंधीचे आरोप केले होते.
(हेही वाचा – Sanatan Dharma : भारताला अखंड राखणारा सनातन धर्म तोडणाऱ्यांपासून सावध राहा – पंतप्रधान मोदी)
त्यानंतर आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्या हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केल्यानंतर मुंबई महानगरपालिके त्या बांधकामाची परवानगी नाकारत कामाला स्थगिती दिली.त्यानंतर वायकरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण त्यांना दिलासा मिळाला नाही.
दरम्यान आता वायकर, (MLA Ravindra Waikar) त्यांची पत्नी आणि इतरांविरोधातआर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून लवकरच या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community