मी गोळ्या झाडल्या नाहीत, पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार- सदा सरवणकर

156

दादरमधील प्रभादेवी येथे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यानंतर दादर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण तापलेले असतानाच सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न

सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी व्हायरल होत आहेत त्याबाबत मला कल्पना नाही. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे पण माझ्यासोबत पोलिस संरक्षण असताना मला स्वतःला बंदूक चालवायची गरज नाही. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला नसून पोलिसांवर दबाव आणून अशाप्रकारचे काम करण्यात येत असल्याचेही सरवणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपण असा कुठलाही गुन्हा केला नसून पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः प्रभादेवीतील राड्याप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल)

काय झाले नेमके?

सदा सरवणकर यांनी यावेळी गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्याबाबत सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते महेश सावंत,शैलेश माळी,चंदन साळुंखे,विनायक देवरुखकर यांनी हल्ला केल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर मी आणि माझा मुलगा समाधान सरवणकर हे तातडीने तिथे पोहोचलो.

(हेही वाचाः प्रभादेवीतील उद्धव गट विरूद्ध शिंदे गटातील राडा प्रकरणी २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल)

मी दादर,प्रभादेवी भागातील आमदार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहे. त्यामुळे मला बदनाम करण्याचे काम करण्यात येत आहे. पण मी काम करुन मोठा झालेला आमदार आहे, भांडणं करुन नाही. या कामांपासून मला थांबवणं हा त्यांचा डाव असल्याचे सदा सरवणकर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.