नगर शहरातील बेकायदा बांधकाम,अतिक्रमणे तसेच निवासी बांगलादेशी रोहिंग्यावरील कारवाईसाठी महापालिकेत आ.संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन केले.तसेच बांगलादेशी घुसखोरांवर (Bangladeshi infiltrators) कारवाई करावी अशी मागणी आ.संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
( हेही वाचा : Tata Group : जमशेटजी टाटांची सर्व स्वप्न पूर्ण करणारे दोराबजी टाटा)
अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील काही आधार केंद्र,सेतू कार्यालयातून जिहादी टोळीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक स्थलांतरित बांगलादेशी लोकांना डुबलीकेट आधार कार्ड,रेशन कार्ड ओळखपत्र देण्याचे काम जिहादी विचाराची टोळी करत आहे.भविष्यकाळात बांगलादेशात जशी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती आपल्या येथे निर्माण झाल्यास हेच लोक आपल्या छाताडावर बसतील.यासाठी हिंदू (Hindu) लोकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचे काम झाले पाहिजेत.आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेत एका आयडीवर ४ ते ५ सेतू केंद्र चालविले जात आहे.त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
जिहादी विचारांचे कार्यालय निर्माण झाले असून जिहादी विचाराचे अधिकारी याना हाताशी धरून बोगस रहिवासी दाखले दिले जात आहे. गो.रा.खैरनार (Go.Ra.Khairnar) सारख्या अधिकाऱ्याला देखील नीट केले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिला आहे. तसेच शहरातील बेकायदा बांधकाम,अतिक्रमणे तसेच निवासी बांगलादेशी कारवाईबाबत महापालिकेतील आयुक्ताच्या दालनात ठिया आंदोलन करण्यात आले असून उपनगरातील अनेक परिसरात बांगलादेशी नागरिक तसेच जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून अनाधिकृत अतिक्रमणे करून जागा बळकवण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे आयुक्तांना निदर्शनात आणून देत कारवाईची मागणी केली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community