संजय राऊत राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना संपवणार – संजय गायकवाड

78
शिवसेना नेते संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना संपवायला निघाले आहे, त्यांच्यामुळे शिवसेना ऱ्हासाला जात आहे, असा घणाघाती आरोप शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केला.

शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली 

शिंदे गट आणि  भाजपा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर शिंदे गटातील सर्व आमदार आपापल्या मतदार संघात परतले, त्यावेळी आमदार गायकवाड हेही त्यांच्या मतदारसंघात परतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला जे जमले आहेत, ते उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करत आहेत, असेही संजय गायकवाड म्हणाले. शिवसेना मूळ हिंदुत्वाच्या विचारापासून दूर जात होती म्हणून आम्ही ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी  राहिलो. आमची बाजू न समजून घेता संजय राऊत यांनी आमच्याविषयी अश्लाघ्य आणि शिवराळ भाषा वापरली, हे अत्यंत चुकीचे होते, असेही आमदार गायकवाड म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.