राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे गुरुवारी जाहीर केले.
( हेही वाचा : शिवसेनेच्या ‘त्या’ मंत्र्यामुळे तरला भाजपचा मतदारसंघ)
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली. सतेज पाटील यांनी २०१० ते २०१४ पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०१९ मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्य मंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी पार पाडली आहे.
“काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो”, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.
Join Our WhatsApp Community