Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या मागणीसाठी आमदार टी राजा येणार कोल्हापुरात

१७ मार्चला कोल्हापुरात मोठा मोर्चा काढण्याचे नियोजन केले असून त्यासाठी तेलंगणातील भाजपाचे आमदार टी. राजा येणार आहेत.

49

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे (Shivaji University)  नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करावे, ही मागणी शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. यासाठी या संघटनांनी १७ मार्चला कोल्हापुरात मोठा मोर्चा काढण्याचे नियोजन केले असून त्यासाठी तेलंगणातील भाजपाचे आमदार टी. राजा येणार आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूरमध्ये 18 नोव्हेंबर 1962 मध्ये शिवाजी विद्यापीठाची (Shivaji University) स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत कोल्हापुरातील विद्यापीठ हे शिवाजी विद्यापीठ नावानेच ओळखले जाते. मात्र, अलिकडच्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाचे (Shivaji University) नामविस्तार करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे या नामविस्ताराच्या मागणीला स्थानिक आमदार-खासदार आणि पालकमंत्र्यांनीही पाठिंबा दिला आहे. तरीही जिल्ह्यातील काही पुरोगामी मंडळींना मात्र पोटशूळ उठला आहे. त्यांनी या मागणीला विरोध करून शिवरायांच्या सन्मानपूर्वक उल्लेख करण्याला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्वसामान्य जनतेमध्ये या पुरोगाम्यांच्या विषयी संताप व्यक्त होत आहे. आता १७ मार्चला होणाऱ्या मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी होणार आहेत. या मोर्च्याला आमदार टी. राजा हे सहभागी होणार असल्याने मोर्च्याचे महत्व वाढले आहे. (Shivaji University)

(हेही वाचा Khalapur मध्ये धर्मांध मुसलमानांचा गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला; सहा आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू)

टी. राजा नेमके काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी सारा हिंदू मैदानात आहेत. कोल्हापुरातील सर्व हिंदुंनो मी कोल्हापुरात येत आहे. 17 मार्च रोजी दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराज यांना छत्रपती या पदवीपासून कोण रोखत आहे? कोण आमच्या इतिहासावर आणि स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करत आहे? या सर्वांना आव्हान देण्यासाठी मी कोल्हापुरात येत आहे, असे भाजपाचे आमदार टी राजा म्हणाले. (Shivaji University)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.