नागपूर लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे अस्वस्थ असणाऱ्या काँग्रेस आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thakre) यांनी आघाडीतील छुप्या गद्दांवर रोष व्यक्त केला आहे. नागपूर शहर काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thakre) यांना लोकसभा निवडणूकीतील पराभव जिव्हारी लागल्याचं स्पष्ट होत आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना लढत दिल्यानंतर ही विजयांने त्यांना दिलेली हुलकावणी ते मान्य करू शकले नाही. त्यामुळे छुप्या गद्दांवर त्यांनी टीका केली आहे.
( हेही वाचा : Maha Kumbh 2025 च्या लोगोचे योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अनावरण; भाविकांना असा होणार फायदा)
ठाकरे म्हणाले की, गद्दारांची नावे आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांचा रोष नेमका कुणाकडे आहे, याबाबत काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काळात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना फोन केले होते. त्यांच्या दबावात अनेकांनी काँग्रेसचे काम केले नाही. नाही तर नागपुरात आज वेगळे चित्र असते, असा दावा आमदार विकास ठाकरेंनी (MLA Vikas Thakre) केला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community