तर शिवसेनेच्या आमदारांचे होणार निलंबन

156

शिवसेनेत बंडखोर आमदारांचा गट अधिकृत की शिवसेनेच्या आमदारांचा गट अधिकृत यावरून चर्चा सुरु असून सध्या तरी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असलेल्या बंडखोर आमदारांचा गट विधीमंडळातील शिवसेनेचा अधिकृत गट म्हणून मानला जावू शकतो. शिंदे गटाकडे तब्बल ३७ ते ३८ आमदार असल्यामुळे त्यांचा गट अधिकृत म्हणून ग्राह्य धरला जावू शकतो आणि त्यांनी बजावलेल्या पक्षादेशाचे पालन करणे पक्षाच्या सर्वच आमदारांना बंधनकारक ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेसोबत असलेल्या १७ ते १८ आमदारांनी शिंदे गटाकडून बजावलेल्या पक्षादेशाचे पालन न केल्यास शिवसेनेसोबत असलेल्या सर्व आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( हेही वाचा : MPSC नवी जाहिरात! ८०० जागांची भरती; असा करा ऑनलाईन अर्ज)

शिवसेनेच्या ३८ आमदारांचा समावेश असल्याचा शिंदे गटाचा दावा

राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार फुटल्याने सरकार धोक्यात आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या अनेक आमदारांनी बंड करत शिवसेनेला राम राम केलेला आहे.शिंदे गटाकडे सध्या एकूण ४८ आमदारांचे पाठबळ असून त्यात निव्वळ शिवसेनेच्या ३८ आमदारांचा समावेश असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे पत्र विधानसभा अध्यक्षांना सादर केले. त्यामुळे शिंदे यांच्या या गटाला मान्यता मिळाल्यास ते विधीमंडळातील शिवसेनेचे अधिकृत गट म्हणून गणले जाणार आहे. त्यामुळे या गटानी नियुक्त केलेल्या प्रतोदांनी पक्षादेश जारी केल्यास त्याचे पालन शिवसेनेसोबत राहिलेल्या आमदारांनी करणे बंधनकारक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह बंड केल्याचे वृत्त आल्याने शिवसेनेने त्यांचे गटनेतेपद काढून शिवडीतील आमदार अजय चौधरी यांना बहाल केले. त्यानंतर विधीमंडळातील प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश काढून सर्व आमदारांनी बैठकीला हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु शिवसेनेच्या बहसंख्य आमदारांचे संख्या बळ आपल्याकडे असल्याने प्रतोदांना असे पक्षादेश बजावता येऊ शकत नाही,अशाप्रकारची हरकत एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यानंतर ही आमदारांची बैठक होऊ शकली नव्हती. परंतु शिवसेनेने आपल्यासोबत अजूनही १८ आमदार असून प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया राबवल्यास २२ आमदारांचे मतदान आम्हाला होईल,असा दावा केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.