पवई तलावातील जलपर्णीवर रासायनिक फवारणी! भाजपने केली ‘ही’ मागणी

पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्याच्या फवारणीबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे १४ सप्टेंबर २०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते स्टॅलिन यांनी तक्रार केली होती.

82

पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी जास्त दराने कंत्राटकाम दिल्यानंतरही आता या जलपर्णी मारण्यासाठी त्यावर रासायनिक द्रव्याचा वापर केला जात असल्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने महापालिका एस विभागाच्या सहायक आयुक्तांना नोटीस बजावली आहे. रासायनिक द्रव्याच्या फवारणीमुळे जलप्रदुषण होण्याची शक्यता वर्तवत हे काम त्वरीत थांबवण्याचे निर्देश दिले आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी हे कसले शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम, असा सवाल करत याप्रकरणी मुंबईच्या महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फवारणी त्वरीत थांबवण्याचे निर्देश दिले 

पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्याच्या फवारणीबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे १४ सप्टेंबर २०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते स्टॅलिन यांनी तक्रार केली होती. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी प्रदुषण मंडळाने याठिकाणची पाहणी करून ही फवारणी त्वरीत थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या रासायनिक फवारणीचा परिणाम तलावातील पाण्यावर आणि जीवसृष्टीवर होण्याची भीती वर्तवली आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार योगेश सागर यांनी जोरदार टिका करत पवई तलावातील जलपर्णी नष्ट करण्यासाठी अशाप्रकारे रासायनिक द्रव्याचा वापर करणे हे कुठले शिवसेनेचे पर्यावरण प्रेम? हे कुठले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रेम असा सवाल केला आहे. या तलावात मासे, मगर  तसेच अनेक प्रकारची जीवसृष्टी आहे. शेकडो,करोडो जीव त्या पाण्यात आहे. पवई तलाव हे मुंबईची छान आहे. जलपर्णी काढण्याचे अन्य मार्ग आहेत. पण आपण सगुणा रुरल फाऊंडेशनला कुठून आणले. त्यांचा याबाबतचा अनुभव काय आहे? त्यामुळे केवळ आणि केवळ टक्केवारीचे धंदे असून पर्यावरणासाठी हे योग्य नसल्याचे सागर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा : कॅप्टन अमरिंदर सिंहांची ‘लढाई’ तून माघार!)

रासायनिक द्रव्याची फवारणी बिनअनुभवी संस्थांकडून!

त्यामुळे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. हे कुठल्या पध्दतीने तलावांचा नाश करायला निघालेले आहेत. तलाव तर तलाव राहिले बाजुला. असलेल्या तलावातील जलपर्णीवर रासायनिक द्रव्याची फवारणी करतात, तेही बिनअनुभवी संस्थांकडून. आपल्याला कुठल्या बगलबच्च्यांना सांभाळायचे आहे, असा सवाल करत मुंबईत असा प्रकार जर करणार असाल, तर ते मुंबईकर सहन करणार नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे लक्षात घ्यावे, असाही इशारा सागर यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.