MLC Oath Ceremony : विधान परिषदेतील ‘या’ ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न!

109
MLC Oath Ceremony : विधान परिषदेतील ‘या’ ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न!
MLC Oath Ceremony : विधान परिषदेतील ‘या’ ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न!

विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांनी रविवारी 28 जुलै रोजी शपथ (MLC Oath Ceremony) घेतली. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, तर शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाने, अजित पवार गटाकडून शिवाजी गर्जे, राजेश विटेकर, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना शपथ देण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबचा उल्लेख केला. त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करुन मी शपथ घेतो की मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार, जय हिंद जय महाराष्ट्र”, असे मिलिंद नार्वेकर शपथ घेताना म्हणाले. (MLC Oath Ceremony)

“जय महाराष्ट्र, जय एकनाथ”

तर दुसरीकडे, भावना गवळी (Bhavna Gawli) यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असे म्हटले आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना ‘जय लहूजी, जय भीम, जय संविधान’ असे म्हटले. तसेच अमित गोरखे यांनी गळ्यात जय लहूजी असं लिहिलेला एक पट्टा घातला होता. सध्या या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (MLC Oath Ceremony)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.