राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यासंबंधीची घोषणा केली होती. पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सोमवारी या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांना एक पत्र लिहून CET चा निकाल (CET Result) लागला, आता तरी GR काढा, अशी जाहीर विनंती केली आहे. (Amit Thackeray)
16 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता एमएचटी-सिएटी (MH -CET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आता लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा स्थितीत आपण तात्काळ कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शासकीय आदेश (GR) पारित करावा, जेणेकरून उच्च शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा व अपेक्षा असणाऱ्या गरजू व गरीब मुलींचे भविष्य सुरक्षित होईल, अशी मागणी अमित ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
(हेही वाचा – दिल्लीतील Indira Gandhi International Airport वर वीजपुरवठा खंडित; अर्धा तास T-3 टर्मिनलवरील काउंटर ठप्प)
अमित ठाकरे यांची नेमकी मागणी काय ?
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेची आठवण करुन देत अमित ठाकरे यांनी पत्रद्वारे महत्त्वाची मागणी केली आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित एका कार्यक्रमात आपण ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना मेडिकल तसेच अभियांत्रिकी आणि अन्य 642 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे गरीब घरातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली झाली होती. (Amit Thackeray)
(हेही वाचा – फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; Sanjay Nirupam यांची मागणी)
इयत्ता बारावीनंतर अनेक हुशार मुलींना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. त्यामुळे बारावीनंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येतील घट पाहून सरकारने हा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयानुसार अंदाजे 5300 उच्च महाविद्यालयांतर्गत 642 कोर्ससाठी 20 लाख मुलींकरिता 1800 कोटी रुपयांचा भार राज्य शासन उचलणार असल्याचे समजले, अशी आठवणच अमित ठाकरे यांनी मंत्री महोदयांना करुन दिली आहे. (Amit Thackeray)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community