मराठी भाषेबाबत MNS आक्रमक; कल्याणमध्ये बँकांना दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

172

MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ३० मार्च रोजी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात (Gudi Padwa Melava 2025) मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत (Bank) मराठी वापरली जाते की नाही ही बाब तपासून पाहा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. ज्यानंतर आता मनसैनिक कामाला लागले असून, कल्याणमध्ये मनसे सैनिकांनी बँकांना १५ दिवसांचा  अल्टीमेटम दिला आहे. (MNS)

(हेही वाचा – Waqf amendment bill मंजूर झाल्यानंतर रझा अकादमीने थेट सरकारलाच दिली धमकी)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या या आदेशाचे पालन मनसेसैनिक मंगळवार १ एप्रिलपासून करताना दिसत आहेत. सुरुवातीला ठाणे, अंबरनाथ, पुणे त्यानंतर आता कल्याणमध्ये मनसेने आक्रमक होत बँकांना निवेदन देऊन पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. 

(हेही वाचा – Indian Railway : अमेरिका, ऑस्ट्रेलियाला मागे टाकत भारतीय रेल्वेचा नवा रेकॉर्ड!)

मनसे कल्याण शहर शाखेच्या वतीने ०४ एप्रिलला कल्याण मधील बँकांना प्राधान्याने मराठीच्या वापराबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर (Ulhas Bhoir) यांच्याकडून बँकांना मनसे लिहिलेले पेपर वेट भेट देण्यात आले. बँकांना मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदन देण्यासोबत पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अर्थात पंधरा दिवसात मराठी भाषा शिकावी तसेच येत्या पंधरा दिवसात बँकेतील व्यवहार मराठीत झाले नाहीत; तर दिलेले पेपरवेट कुठे कुठे लागतील याला आम्ही जबाबदार नसू, असा इशारा देखील मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. माजी आमदार प्रकाश भोईर, महिला कल्याण शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई, जिल्हाध्यक्ष उर्मिला तांबे हे देखील यावेळी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.