काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. अशातच भाजपचे नेते आणि शिंदे गटाने राहुल गांधी यांच्यावर आक्रमक होत सडकून टीकास्त्र सोडले आहे. यासोबत आता मनसे देखील आक्रमक झाली आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अपमानजनक वक्तव्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आक्रमक होत त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा, असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. उद्या, शुक्रवारी काँग्रेसची भारत जोडो यात्रा बुलढाण्यात असणार आहे. या ठिकाणी राज्यातील मनसे कार्यकर्त्यांना जमा होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. राज ठाकरेंनी आपल्या राज्यभरातील मनसैनिकांना शेगावला जमा होण्याचे आदेश देत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा, असे निर्देश दिले आहेत.
(हेही वाचा – “राहुल गांधी मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसात नाही”)
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अनेक टीका केल्यात. राज ठाकरेंनी या सर्व टीका गांभीर्याने घेत मनसेने आपले पाऊल उचलले आहे. यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील मनसैनिकांना शेगावात पोहचून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा निषेध करत त्यांना काळे झेंडे दाखवावे, असा आदेश दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने होणाऱ्या आरोपांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मनसैनिक उद्या शेगाव येथे जमणार आहे. यासाठी भारत जोडो यात्रेला निषेध करण्यासाठी शेगावात हजर होणार असल्याची माहिती मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community