स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून आता मनसे नेते आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा, असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यापार्श्वभूमीवर मनसेचे काही नेते राहुल गांधींची सभा होणाऱ्या बुलढाण्यातील शेगावकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांनी बुलढाण्यातील चिखली इथे अवडले. यानंतर या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्याच ठिय्या मांडला. यावेळी राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या गेल्या.
या मनसे नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
राहुल गांधींच्या सभेठिकाणी जात असलेल्या मनसेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना बुलढाण्याच्या चिखलीच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना ठेवण्यात आले आहे. या नेत्यांमध्ये प्रकाश महाजन, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि काही स्थानिक नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधींची सभा आज, शुक्रवारी शेगाव येथे जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान बुलढाण्यातून शेगावकडे जाणाऱ्या मार्गावर काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींच्या यात्रेचे फ्लेक्स लावले. हे फ्लेक्स मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडले तर यावेळी आम्हाला शेगावला जाण्यापासून का रोखलं जात आहे, असा सवालही मनसे नेत्यांकडून केला जात आहे. इतके असताना आम्ही शेगावला जाणारच असेही मनसे नेत्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – “… हे आम्ही खपवून घेणार नाही”, चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा)
ज्या पद्धतीने पोलीस वागत आहेत आणि काँग्रेस नेते घाबरले आहेत. जरी नेत्यांना अडवले असले तरी आमचे महाराष्ट्र सैनिक थांबणार नाहीत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले. यासह राहुल गांधींच्या सभेत गोंधळ होणारच असा इशाराही मनसे नेत्यांनी यावेळी दिला.
Join Our WhatsApp Community