महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता उद्धव ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आरोप केला. मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हे गंभीर आरोप केला आहे. ठाकरे सरकार असताना मुंबईत सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखल्या जाणारे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचे अध्यक्षपद हे त्यावेळेच्या शिवसेनेकडे होते. त्यावेळी मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकर यांच्या बसवण्यात आले. त्यावेळी बांदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला.
सिद्धीविनायक ट्रस्टच्या नावाखाली बांदेकर यांनी पैसे खाल्याचे किल्लेदार यांचे म्हणणे आहे, यावेळी किल्लेदार म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार असताना ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. दरम्यान यावेळी या शिवभोजन थाळीचे काम सिद्धिविनायक न्यास मंदीराला देण्यात आले होते. मंदीर प्रशासन ही थाळी देऊ शकले असते, पण बांदेकरांनी याला फक्त अर्थसहाय्य देतो असे पत्र दिले. बांदेकरांनी फक्त उद्धव ठाकरे यांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी आणि कॅबिनेट दर्जा मिळण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप किल्लेदार यांनी केला.
(हेही वाचा चार न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अवैध ठरवलेल्या ‘वक्फ’ला नेहरूंनी दिली नवसंजीवनी )
कोरोना काळात शिवथाळीत भ्रष्टाचार
बांदेकरांनी याच्यासाठी वेळ न घालवता 19 जानेवारीला ठराव केला आणि 28 जानेवारीला वेगळे अकाउंट काढले. दरम्यान हा कोरोनाचा काळ होता या काळात त्यांनी हा प्रकार केल्याचे किल्लेदार म्हणाले. कार्यकारी अधिकारी आणि बांदेकर यांनी परस्पर निर्णय घेतला यावर कार्यकारी अधिकारी यांचा रिमार्क आहे. यामध्ये बांदेकरांनी सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टचा पाच कोटी फंड पाठवला नंतर यांनी पत्र लिहले की तरतुदी करून घेण्यास सांगितले, कारण 25 हजार पेक्षा पैसे पाठवता येत नाही त्यासाठी सरकारचा ठराव लागतो. दरम्यान या निर्णया विरोधात काही विश्वस्तानी कोर्टात शपथपत्र दिले आहे. की या गोष्टीशी आमचा संबंध नाही यामुळे बांदेकरांनी मंदीर प्रशासनातील कोणालाही विश्वासात न घेता हा प्रकार केल्याचे किल्लेदार म्हणाले. नियमाप्रमाणे बैठक झाली पाहिजे, पण तसे काही झाले नाही. परस्पर आदेश बांदेकर यांनी चेकवर सह्या करून हे पैसे पाठवले. दरम्यान आम्ही हा सगळ्या गोष्टीची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले.
किल्लेदार यांनी केले ट्विट
तसेच यशवंत किल्लेदार यांनी काही ट्विट केले आहेत, त्यात किल्लेदार यांनी, आदेश बांदेकरांनी व संबधित अधिकारी सिद्धिविनायक न्यास मंदीर यांनी केलेल्या गैरकारभारामुळे थोड्या वेळात आम्ही त्यांना प्रसाद देणार आहोत….पुराव्यांचा प्रसाद पाहुन बांदेकरांनी त्यावर आपली अक्कल जरूर पाजळावी. प्रभादेवी विभागातील सिद्धिविनायक न्यास मंदीराकडून १ कोटी ४० लाख रू ॲडव्हान्स टॅक्स भरलाय आमची मागणी आहे संपूर्ण टॅक्स प्रकरण संबंधित अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी यांची राज्य सरकारने निष्पक्ष चौकशी करावी चौकशी करणे गरजेचे आहे, असे म्हटले.
आदेश बांदेकरांनी व संबधित अधिकारी सिद्धिविनायक न्यास मंदीर यांनी केलेल्या गैरकारभारामुळे थोड्या वेळात आम्ही त्यांना प्रसाद देणार आहोत….पुराव्यांचा प्रसाद पाहुन बांदेकरांनी त्यावर आपली अक्कल जरूर पाजळावी
— Yashwant Killedar (@YKilledar) December 2, 2022
प्रभादेवी विभागातील सिद्धिविनायक न्यास मंदीराकडून १ कोटी ४० लाख रू ॲडव्हान्स टॅक्स भरलाय आमची मागणी आहे संपुर्ण टॅक्स प्रकरण संबंधित अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी यांची राज्य सरकारने निष्पक्ष चौकशी करावी चौकशी करणे गरजेचे आहे
— Yashwant Killedar (@YKilledar) November 21, 2022
(हेही वाचा ६ डिसेंबरला दादरमध्ये मद्य विक्रीस बंदी)
Join Our WhatsApp Community