अखेर भाजपाने  मनसेला  बिनशर्त स्वीकारले! 

पालघरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती तेव्हाच होईल जेव्हा मनसे परप्रांतीयांच्या मुद्द्यावरील आग्रही भूमिका सॊम्य करील, असे स्पष्ट मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडले होते. त्यामुळे भाजपाच्या या अतिशर्थीमुळे भाजपा-मनसे युती होणार नाही, अशी शक्यता होती. मात्र याला छेद देणारी घटना पालघरमध्ये घडली. पालघर येथील जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने मनसेला बिनशर्त स्वीकारले आहे. या ठिकाणी भाजपा आणि मनसे यांची युती जाहीर झाली आहे.

पुण्यातही युतीसाठी आग्रह 

पालघरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे. दरम्यान पुढच्या वर्षी होणाऱ्या पुन्हा पुणे महापालिका निवडणुकीतही मनसेने भाजपाशी युती करावी, अशी आग्रही भूमिका मनसेच्या स्थानिक नेत्यांनी मनसेच्या पक्ष श्रेष्टींकडे केली आहे. त्यामुळे मनसेला त्याचा फायदा होणार आहे, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुणे दौरा केला होता. आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होणार आहे. त्यामुळे मनसेला ही निवडणूक जड जाईल, असे मत मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुणे येथेही मनसे – भाजप यांची युती होणार का, हे पाहावे लागणार आहे.

(हेही वाचा : सारंगी महाजनांची राजकारणात होणार एन्ट्री! का आणि कधी? वाचा…)

…तर मुंबईतही युतीची शक्यता! 

जर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे – भाजपा यांची युती झाली तर मात्र मुंबई महापालिकेतही भाजपा – मनसे यांची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मात्र असे असले तरी मनसेने त्यांचा परप्रांतीयांचा मुद्दा सोडल्याचे अजून तरी जाहीर केलेले नाही. त्यामुळे भाजपा-मनसे यांच्या युतीतील भाजपाने तडजोड करत मनसेसाठी टाकलेली अट मागे घेतली का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here