मनसेने कधीच अर्धवट आंदोलन सोडून देत नाही. पाकिस्तान कलाकारांना हाकलून लावले, मशिदीवरील भोंगे खाली उतरवले. ही सगळी आंदोलने आपण केली, तेव्हा सो कॉल्ड हिंदुत्ववादी काय करत होते? चिंतन! त्यानंतर मला अयोध्या दौऱ्याला विरोध झाला. त्याचे पुढे काय झाले ठाऊक आहे ना? आमच्या वाट्याला यायचे नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी माझ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले, त्याचा काय परिणाम झाला, मुख्यमंत्री पद गेले, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. एक आंदोलन दाखवावे जे मनसेने अर्धवट सोडले आहे. सगळी जबाबदारी आमची आहे का? टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे एकेकाळी आश्वासन देणाऱ्या सेना-भाजपाला एकदाही याविषयी विचारत नाही. १७ वर्षांत आपण काय केले, त्या दरम्यान काय आंदोलने केली, त्याचे पहिले डिजिटल पुस्तक आज प्रकाशित करत आहोत, त्यात पुढेही भर पडत जाईल. नाशिक महापालिकेत ५ वर्ष सत्ता राबवली त्यामध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community