मनसेच्या स्थापनेपासून १७ वर्षांत मी काय केले, असे मला विचारतात, त्या काँग्रेसलाही विचारा, काय त्यांची स्थिती झाली. भरतीनंतर अहोटी, अहोटीनंतर भरती होतेच. भाजपनेही लक्षात घ्यावे. आता भरती सुरु आहे, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या परिस्थितीत राजू पाटील मनसेची बाजू एकटा मांडतोय. शोले पिक्चरमध्ये डायलॉग होता ‘एकही है पर काफी है’. विधानसभा भरली तर काय होईल त्यांचे? जाणूनबुजून आपल्या पक्षाविषयी अपप्रचार केला जातो? संभ्रम निर्माण केला जातो, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. संदीप देशपांडेवर हल्ला झाला, आत्मचरित्राची आणखी ४ पाने वाढली. त्यादिवशी मी काही बोललो नाही, अनेक जण माझी प्रतिक्रिया विचारात होते. पण आताच सांगतो ज्याने हे केले, आधी त्याला कळेल आणि मग सगळ्यांना कळेल. माझ्या मुलांचे रक्त मी वाया जाऊ देणार नाही, असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला. १७ वर्षांचे पक्षाचे सिहांवलोकन होणे गरजेचे आहे. काही जण पक्ष सोडून गेले ते एकेकटे गेले. मग लोक विचारतात लोक गर्दी करतात, मग मते का देत नाही? मग १३ आमदार निवडून आले होते ते काय सोरटवर निवडून आले होते का? जाणूनबुजून असा प्रचार करतात, असेही राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा Maharashtra budget 2023-2024 : तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन)
Join Our WhatsApp Community