शिवजयंती सण आहे, तिथीनुसारच साजरा करा! राज ठाकरेंकडून शिवसेनेची गोची

188

कालपर्यंत शिवसेना शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी करता आहे, मात्र सत्तेत आल्यावर मात्र सेनेचा हा आग्रह कमी झाला आहे, त्याचाच धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या 16व्या वर्धापन दिनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना 21 मार्च रोजी शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरा करा, कारण आपण सण हे तिथीनुसार साजरे करतो, शिवजयंती हाही सण आहे, त्यामुळे तो सणाप्रमाणे साजरा करायचा आहे, आपण मराठी लोक शिवरायांच्या भागात राहतो, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६वा वर्धापन दिन पुणे येथे होत आहे. त्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे स्वत: हजर आहेत.

  • पुण्यातील गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांचे आगमन झाले
  • व्यासपीठावरील शिवराय, वीर सावरकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला
  • मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी अमित ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली.
  • पुण्यामधील वातावरण बदलते आहे, सोळाव वरीस धोक्याचे त्यांच्यासाठी मनसेसाठी मोक्याचे आहे – बाळा नांदगावकर
  • दोन वर्षांत कधी भाषण केले नाही, 2 वर्षांपूर्वी आझाद मैदानात भाषण केले ते शेवटचे
  • लॉकडाऊन झाले, कुणी विचार केला नव्हता की हा दिवस आपण पाहू
  • सहज स्पर्श करायला भीती वाटू लागली होती, घरातल्या व्यक्तीने दिलेला पाण्याचा ग्लासही घ्यायचा याची भीती वाटायची, निरव शांतता होती
  • महिन्यातून 2 दिवस लॉकडाऊन करावा
  • कोकीळाही कोविड कोविड म्हणून ओरडू लागल्या
  • माझ्या पक्षावर, माझ्यावर संकटे आली, ती येताना हातात हातात येत असतात, त्यातून शिकायचे
  • चढ उतार येत असतात, जगातील प्रत्येकाला वाईट काळ आला, एका व्यक्त लता ताई याला अपवाद होत्या, पण तरीही ते सहज मिळाले नाही, संघर्ष करावा लागला
  • शिवशाहीर पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवले
  • जातीत गुरफटवून ठेवले
  • परवा आमचे राज्यपाल यांना समज आहे का
  • पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा वाटले कुडबुडे ज्योतिषी होते
  • ना शिवरायांनी रामदास स्वामी माझे गुरू होते आणि स्वामी असे म्हटले नव्हते
  • आमच्या महापुरूषांना बदनाम करायचे
  • ज्योतिबा फुले यांचे बाल विवाह झाला म्हणायचे तेव्हा व्हायचे तुमचे अजून झाले नाही
  • निवडणुका लांबणीवर पडणार हे मी आधीच सांगितले होते
  • वातावरणात निवडणूक यावी लागते
  • यांना निवडणूका घ्यायच्याच नव्ह्त्या
  • तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या
  • लोकांना निवडणुका नकोच आहे, जरा जनतेचा मते घ्या
  • या निवडणुका होऊच नये अशी त्यांची ईच्खा आहे
  • 2 महिन्यात परीक्षा संपतील सगळे बाहेर जाईल, निवडणुका दिवाळीनंतर होतील असे म्हटले
  • युक्रेनचे काय होईल, चर्चा करत आहे अरे तुझ्या घरी काय सुरू आहे हे बघ
  • घरात काम निघून बसले आहे, शाळेत जाणारे घरी बसले आहेत
  • मी अशी परिस्थिती कधी पाहिली नाही
  • 2 वर्षे विसरू शकत नाही
  • साहेबांचे वजन वाढले आहे म्हणत आहेत, माझे दुखण्यामुळे व्यायाम थांबला आहे
  • प्रत्येक जण औषध सांगताे प्रत्येकाल साक्षात्कार होता
  • आजचे भाषण टीझर आहे पिक्चर 2 एप्रिलला शिवतीर्थावर गुढीपाडव्याला होणार
  • राज्यातील राजकारणात काय सुरू आहे
  • कुठचाही विचार न करता एकमेकांवर बरळायचे
  • तो संजय राऊत चॉनल लागले की सगळे सुरू होते
  • आपण काय बोलतो कसे बोलतो, महाराष्ट्रातील भविष्याच्या पिढ्या तुम्हाला पहात आले
  • शिक्षण, महिला, एसटी, नोक-या यावर कुणी बोलत नाही
  • चिंता फक्त रेड कुणावर पडते
  • संपर्क कार्यालय उघडून बसतात
  • कार्यालयाशिवाय काम घेऊन येतात ते महत्वाचे आहे
  • माझ्याकडे येतात तेव्हा ते विश्वासाने येत असतात
  • जे लोक तुम्हाला मत देतात त्यांचे आभार माना फक्त 1 टक्का लोक काम घेऊन येतात
  • अनेक कामे आपल्याला करायचे आहे
  • मी प्रत्येकाकडे जाणार आणि जात बघून जाणार नाही
  • 21 मार्च तिथीनुसार शिवरायांची तिथीनुसार साजरी करा
  • मराठी लोक कुठे रहातात शिवरायाच्या भूमीत होताे
  • तिथीने का करतो कारण प्रत्येक सण तिथीने करतो, म्हणून हा सण आहे, शिवजयंती सण तिथीनुसारच साजरा करा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.