हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीत योगी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले होते. त्यानंतर आता योगी सरकारने मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य केल्यानंतर आता मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाभकास आघाडीला आता मदरशात राष्ट्रगीत सक्तीसाठी पण कायदा लागणार का?, असा खोचक सवाल मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
(हेही वाचाः “राज ठाकरेंची ‘पदवी’ ढापण्याचा प्रयत्न कराल तर…”, मनसेचा सेनेला इशारा)
शालिनी ठाकरे यांचे ट्वीट
यूपीमध्ये अजान, रस्त्यावरील नमाज आणि आता मदरशात राष्ट्रगीत. पण महाराष्ट्रातील महाभकास आघाडीला भोंगे उतरवायला कायदा लागतो आणि आता मदरशांत राष्ट्रगीत सक्तिसाठी पण कायदा लागणार का?
हिंदुत्वाचे कैवारी फक्त तोंडाने नुसतेच बोलणार की कृती पण करणार.
आ देखे जरा किसमें कितना है दम…..!!!
असे ट्वीट करत शालिनी ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
यूपीमध्ये अजाण,रस्त्यावरील नमाज आणि आता मदरशात राष्ट्रगीत पण महाराष्ट्रातील महाभकास आघाडीला भोंगे उतरवायला कायदा लागतो आणि आता मदरशात राष्ट्रगीत सक्तिसाठी पण कायदा लागणार का..?
हिंदुत्वाचे कैवारी फक्त तोंडाने नुसतेच बोलणार की कृती पण करणार.आ देखे जरा किसमें कितना है दम…..!!! pic.twitter.com/WqO6cyKUzC
— Shalini Thackeray (@ThakareShalini) May 13, 2022
(हेही वाचाः आता मदरशांमध्ये राष्ट्रगीत वाजणार! योगी सरकारचा मोठा निर्णय)
योगी सरकारचे निर्देश
मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना मदरशांमध्ये शिक्षण देण्यात येते. सध्या उत्तर प्रदेशातील मदरशांना रमजानची सुट्टी देण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा मदरशांमधले शिक्षण सुरू झाले आहे. त्यानंतर आता राज्यातील सर्व मदरशांमध्ये इतर शाळांप्रमाणे राष्ट्रगीत अनिवार्य असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने 9 मे रोजी राज्यातील सर्व अल्पसंख्यांक कल्याण अधिका-यांना एक परिपत्रक बजावले होते. 24 मार्च 2022 रोजी पार पडलेल्या परिषदेच्या बैठकीत मान्यता प्राप्त, अनुदानित किंवा गैर अनुदानित मदरशांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून मदरशांमधील नित्याच्या प्रार्थनेबरोबरच सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community