औरंगाबाद सभा : राज ठाकरेंचा ‘वसंता’ पुन्हा चर्चेत

94

राज ठाकरेंच्या या वर्षीच्या सभाच तडाका गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरु झाली, त्यावेळी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय मांडला आणि तेव्हापासून पुण्यातील मनसेचा चेहरा वसंत मोरे अर्थात तात्या चर्चेत आले. कारण मोरे यांनी राज यांच्या भोंंग्याच्या मुद्द्याला विरोध केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तरसभा घेतली, तेव्हा मोरे यांनी सभेत पहिले भाषण करून ते नाराज नसल्याचे सांगितले. मात्र उत्तरसभेतही राज ठाकरे यांनी भोंग्यांचाच विषय मांडला आणि आता औरंगाबाद येथेही सभा होत आहे आणि पुन्हा मोरे चर्चेत आले आहेत. मोरे शेकडो कार्यकर्त्यांसह पुण्याहून औरंगाबाद येथे रवाना झाले आहेत.

काय म्हणालेले वसंत मोरे? 

मागील आठवडाभरापासून ही सभा चर्चेत आली आहे. या सभेत राज ठाकरे यांच्या आधी कोण बोलणार अशीही चर्चा सुरु झाली आहे. ठाण्यातील उत्तर सभेत जेव्हा वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या आधी बोलायला दिले. त्यावेळी बोलताना वसंत मोरे यांनी मागील ४-५ दिवसांत राज्यातील एक पक्ष राहिला नाही, ज्यांनी मला ऑफर दिली नाही, इतके काम मनसेचा नगरसेवक म्हणून मी केले, म्हणून माझी चर्चा सुरू झाली, अशी जाहीर कबुली दिली होती.पुण्यात कोरोना काळात सरकार, महापालिका काम करत नव्हती, पण मनसे काम करत होती. मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर होते. सरकार मागे पडत होते, तेव्हा मनसेने दवाखाने उभे केले. जसा कोरोनाचा ट्रेंड बदलत गेला, तसे बँक, फायनान्सवाले लोकांना त्रास देऊ लागले, अशा वेळी मनसे मदतीला आली. पुण्यात आम्ही ब्लु प्रिंटनुसार काम केले आहे, ते पाहायचे असेल तर कोंढव्यात येऊन बघा, साईनाथ बाबर आणि मी दोनच मनसे नगरसेवकांची चर्चा सुरु आहे. पुरस्कार देण्याची वेळ आली तेव्हा मनसेच्या २ नगरसेवकांची नावे चर्चेत आली. १६ वर्षांत १६ गार्डन निर्माण करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. जेव्हा चर्चेतील चेहरा म्हणून मला पुरस्कार दिला, तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले तुम्ही भाजपमध्ये या, तेव्हा मी म्हणालो, १५ वर्षे मी भाजपच्या नगरसेवकाला पाडून जिंकलो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची कामे जनतेसमोर आणली पाहिजे, असे मोरे म्हणाले होते.

(हेही वाचा भाजपसहित सगळ्यांची ऑफर होती! वसंत मोरेंची जाहीर कबुली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.