‘…औरंगजेब इथे गाडला गेला’; राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेकडून Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये बॅनरबाजी

84
'...औरंगजेब इथे गाडला गेला'; राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेकडून Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये बॅनरबाजी
'...औरंगजेब इथे गाडला गेला'; राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेकडून Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये बॅनरबाजी

औरंगजेबच्या (Aurangzeb) कबरीवरून राज्यभरात वाद सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अप्रत्यक्ष आदेशानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक बॅनर लावण्यात आले आहे. एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होतीये तर दुसरीकडे, औरंगजेब इथे गाडला गेला, अशा आशयाचे बॅनर मनसेकडून (MNS) खुलाताबादपासून २७ किलोमीटरआधी लावण्यात आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर (Sumit Khambekar) यांनी हे बॅनर लावले असून यावर राज ठाकरे आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचे छायाचित्र आहे. तसेच राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेली घोषणाही लिहण्यात आली आहे.

( हेही वाचा : वक्फ सुधारणा विधेयकावरून Chitra Wagh यांचा राऊतांना टोला; म्हणाल्या, मातोश्रीवर वक्फ बोर्डाची…

गुढीपाडवा मेळाव्यात दि. ३० मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, औरंगजेबाची कबर हटवण्यापेक्षा तिथली सजावट हटवा आणि तिथे पोस्टर लावून त्यावर लिहा, ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला’ तसेच औरंगजेबाची कबर दाखवण्यासाठी शाळेच्या सहली घेऊन जात त्यांना महाराजांनी आपला धर्म भ्रष्ट करणाऱ्या औरंगजेबाला कसे गाडले, हे दाखवा, असेही ठाकरे म्हणाले. (Chhatrapati Sambhaji Nagar)

त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar ) मनसेकडून (MNS) बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला’ असे त्या बॅनरमध्ये लिहण्यात आले आहे. तसेच खुलाताबाद २७ किलोमीटरवर आहे, असेही लिहले आहे. यासोबत राज ठाकरे आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा फोटोदेखील लावण्यात आला आहे. या बॅनरचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.