राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यासह काही आमदार बाजुला होत शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सामील झाल्याने वारंवारच्या पक्ष फुटीने इतर पक्षांसोबत जाण्याच्या घटनांबाबत मनसेच्यावतीने आता अनेक ठिकाणी बॅनर लावत जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, संभाजी ब्रिगेड आदी पक्षाच्या बदलेल्या भूमिकांबाबत मनसेनेही फक्त एकच पक्ष. . . महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकच नेता राजसाहेब ठाकरे हे एकाच भूमिकेवर आजही पाय रोवून उभे असल्याचे या बॅनरद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानासह (शिवाजी पार्क) इतर परिसरात लावलेले बॅनर हे आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नव्हे तर बदलेल्या राजकीय समीकरणाबाबत जनतेमधून चिड व्यक्त केली आहे. त्यातच देशपांडे यांनी शिवाजीपार्क परिसरात लावलेल्या बॅनरवर काँग्रेस शिवसेनेबरोबर, शिवसेना भाजप बरोबर, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, एमआयएम वंचित बरोबर, वंचित शिवसेने बरोबर, शिवसेना संभाजी ब्रिगेड बरोबर, संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर. . . यांनी जे गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात केले त्याला भुमिका बदलणे बोलतात. . . फक्त एकच पक्ष. . . महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकच नेता राजसाहेब ठाकरे. . एकाच भुमिकेसह आजही पाच रोवुन उभे. . . काल, आज आणि उद्याही मराठी, महाराष्ट्र आणि हिंदुत्वासोबत महाराष्ट्रासाठी एकच पर्याय, राजसाहेब ठाकरे, अशाप्रकारचे बॅनरच सर्वत्र लावण्यात आले आहे.
(हेही वाचा – NCP : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शुन्यच)
त्यामुळे महाराष्ट्रातील जनता असलेल्या नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला भरभरुन मतदान करतील का असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे आण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे अशी आर्जवी केली जात आहे. बॅनरद्वारे हे आवाहन केले जात आहे. त्यातच मनसेकडून आता मतदारांना आणि जनतेला पुन्हा एकदा आपल्या पक्षाची आणि नेत्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community