हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला पुन्हा घेरले, शिवसेना भवनाबाहेर केली बॅनरबाजी!

74

माननीय बाळासाहेब,

बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालिसा म्हणायला बंदी घालत आहेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढत आहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा ख-या अर्थाने फक्त राजसाहेब ठाकरेच चालवत आहेत. जमल्यास उद्धवजींना हिंदूबाबत समृद्धी द्या.

असे बॅनर दादरमध्ये झळकवल्याने सर्वत्र सध्या या बॅनरची चर्चा आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सतत शिवसेना आणि मनसेमध्ये आरोप- प्रत्यारोप होतच असतात. आता मनसेच्या बॅनरमुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला मनसेने हिंदुत्वाचीच आठवण करुन देत काही सवाल केले आहेत. शिवसेना भवनसमोर  मनसेने लावलेल्या बॅनरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. मनसेची शिवसेनेविरोधात ही काही पहिली बॅनरबाजी नाही. यापूर्वी देखील मनसेने शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी करुन शिवसेनेला लक्ष्य केले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मनसेने शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन दिल्याचे दिसत आहे. शिवसेना भवनसमोरील मनसेचे हे बॅनर चांगलेच चर्चेत आले आहेत.

राज यांच्या भूमिकेवर पदाधिकारी नाराज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेवर मुस्लिम पदाधिकारी नाराज आहेत. पुण्यातील काही मनसे पदाधिका-यांनी राजीनामे दिले. तर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन राजकीय अडचण होत असल्याचे म्हटले.

( हेही वाचा :विक्रांत युद्धनौकेच्या नावावर 58 कोटींची रक्कम लाटली राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप! )

याआधीही केली होती बॅनरबाजी

यापूर्वी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे अशा आशयाचा बॅनर सेना भवनासमोर लावण्यात आला होता. तो बॅनरही शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क परिसरात लावला होता. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या गुढीपाडव्याच्या बॅनरमधून मनसेकडून शिवसेनेला टोला लगावला आहे. हा तब्बल 20 फुटाचा बॅनर होता. लोकांचे लक्ष वेधून घेत असलेल्या बॅनरची चर्चा त्यावेळी झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.