पोस्टर वाॅर कायम! आता मनसेचे शिवसेनेला चोख प्रत्युत्तर

162

शिवसेना आणि मनसेमध्ये आता नवीन वाद सुरु झाला आहे. गुरुवारी शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर काल आज आणि उद्या या मथळ्याखाली राज ठाकरेंचा मुस्लिम पेहरावातील एक फोटो, त्यानंतर हनुमान चालिसा आणि उद्या काय भूमिका असणार असे पोस्टर लावले होते. आता त्यालाच चोख प्रत्युत्तर म्हणून, मनसैनिकांनी त्याच मथळ्याखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत पोस्टर तयार केले ते शिवसेना भवनाबाहेर लावणार तेवढ्यात पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पण असे जरी असले तरी, त्या पोस्टरचे फोटो मात्र सोशल मिडीयावर व्हायर झाले आहेत.

शिवसेना आणि मनसे संघर्ष तीव्र होणार

मनसेकडून तयार करण्यात आलेल्या पोस्टरवरती एका बाजूला बाळासाहेब ठाकरे, त्याच्यापुढे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासोबतचा फोटो आहे. तर उद्या या रकान्याखाली असलेला भाग मोकळा सोडण्यात आला आहे. अशाप्रकारे मनसेने शिवसेनेला त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुढी पाडव्याच्या भाषणापासून हे पोस्टरवाॅर सुरु झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: लालपरी पुन्हा धावण्यास सज्ज, वाचा ही महत्त्वाची बातमी! )

पोस्टरवाॅर सुरुच

गुढी पाडव्याला राज ठाकरेंच्या सभेनंतर ही पोस्टरबाजी सुरु झाली आहे. दादर येथील शिवसेना भवनाबाहेर मनसेकडून ठाकरे बाणा आणि वारसा ख-या अर्थाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे चालवत आहेत, असे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना समज द्यावी असादेखील बॅनरमध्ये उल्लेख होता. अनेकदा मनसेने शिवसेना भवनाबाहेर बॅनर लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.