राज्य सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण देत यंदाच्या वर्षीही अर्थात सलग दसऱ्या वर्षी दहिहंडीवर निर्बंध लादण्यात आली आहे. त्यामुळे आधीपासूनच भाजप आणि मनसे हे आक्रमक बनले होते. त्यांनी बंदी झुगारून दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना नोटीस दिल्या, मात्र तरीही मनसेच्या नेत्यांनी दहीहंडी साजरी केलीच.
‘या’ ठिकाणी फोडली हंडी!
मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठा स्टेज उभारला होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मनसे नेत्यांनाही नोटीस पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मनसे पुढे काय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर ३० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा मनसेने दहीहंडी फोडलीच. यावेळी ठाणे येथील मनसेच्या कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्यांनी दहहंडी फोडली, तसेच ठाण्यातील वर्तक नगर येथेही मनसेच्या विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडली. तर वरळी नाका, घाटकोपर येथील भटवाडी, मानखुर्द, मुलुंड, नाशिक येथेही मनसेच्या वतीने दहीहंडी फोडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
आज दिवसभर काय होणार?
दरम्यान मंगळवारी राज्यात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी करणार का, त्यासाठी मनसे , भाजप पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनीही दहीहंडी साजरी करणारच, असा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप असो किंवा मनसे असो हे दहीहंडी साजरी करणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community