मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा प्रकृतीमुळे स्थगित करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्यावर २० जूनला सकाळी लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. यासंदर्भात आता स्वत: राज ठाकरेंनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
( हेही वाचा : राज ठाकरेंनी अॅक्टिव्ह होण्याची हीच वेळ )
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना रूग्णालयातून सुद्धा डिस्चार्ज मिळाला आहे. अशी माहिती त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे. टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.
राज ठाकरेंचे ट्वीट
आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. काही वेळापूर्वी रुग्णालयातून बाहेर पडून मी घरी पोहोचले आहे! आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो! असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.
( हेही वाचा : गणपती उत्सवासाठी ‘लालपरी’ सज्ज! एसटी महामंडळ कोकणात सोडणार २५०० गाड्या; २५ जूनपासून आरक्षण सुरू)
— Raj Thackeray (@RajThackeray) June 25, 2022
Join Our WhatsApp Community