‘या’ मशिदींवर कारवाई कधी होणार? राज ठाकरेंनी सांगितली आकडेवारी

177

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला दिलेले अल्टिमेटम मंगळवारी संपले. त्यानंतर बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी मशिदींमध्ये अज़ान भोंग्यांशिवाय करण्यात आली. त्याच बाबतीत आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मशिदींमधील मौलवींचे आभार मानले आहेत. तसेच ज्या मशिदींवर भोंगे वाजवून अज़ान लावण्यात आली, त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा व्हिडिओ, भोंग्यांबाबत काय म्हणाले होते बाळासाहेब?)

त्यांच्यावर कारवाई कधी?

बुधवारी महाराष्ट्रात 90-92 टक्के ठिकाणी सकाळची अज़ान झाली नाही. त्या सर्व मशिदींमधील मौलवींचे मी आभार मानतो. माझा विषय त्यांना नीट समजला. मुंबईच्या रिपोर्टनुसार, मुंबईत एकूण 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळी 5च्या आत अज़ान सुरू झाली. मंगळवारी मला पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आला होता. सर्व मशिदींवर सकाळची अज़ान लागणार नाही, असे त्यांच्याकडून मला सांगण्यात आले. मग ज्या 135 मशिदींवर पहाटे 5 च्या आत अज़ान झाली, त्यांच्यावर राज्य सरकार आता कुठली कारवाई करणार आहेत की फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना उचलणार आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंच्या अटकेचा मनसेला ‘असा’ झाला होता फायदा)

कायद्याचे पालन करणा-यांना शिक्षा

राज्यात अनेक ठिकाणी मनसेच्या पदाधिका-यांना, कार्यकर्त्यांना पोलिस नोटीस पाठवत आहेत, त्यांना ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत का होत आहे? जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना तुम्ही मोकळीक देणार, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचाः बाळासाहेबांनी घडवलेल्या ‘त्या’ इतिहासाची पुनरावृत्ती राज ठाकरे करणार, मनसेचा दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.