निवडणुका आणि लॉकडाऊनवरुन राज ठाकरेंचा सरकारवर खळबळजनक आरोप

यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून.

96

सर्व बंद करुन यांना प्लॅनिंग करायचे आहे मग निवडणुका जाहीर करायच्या… म्हणजे बाकीचे तोंडावर पडतील, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे ठाकरे सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

दिला थेट इशारा

लाट यायला हा काय समुद्र आहे का? काही जाणवतं का तुम्हाला? उगाच इमारती सील करायच्या. अमेरिकेचे अमेरिका बघेल, तुमच्याकडे नाही ना. आता सर्वांना बंदी करुन ठेवायचे आणि हे सर्व निवडणुकीसाठी सुरू आहे. यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

(हेही वाचाः निर्बंधांची हंडी फोडणा-या मनसैनिकांवर कारवाई… नांदगांवकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात)

म्हणून निवडणुका लांबणीवर

निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोवर निवडणुका घेऊ नये असा दबाव आहे. त्यामुळे आगामी काळातील नियोजित महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. राज्यात पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. महापालिका निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत.

ओबीसींची हानी होईल- फडणवीस

जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला होता.

(हेही वाचाः शिवसेनेकडून आता नारायण राणेंवर कौतुकाचा ‘वर्षा’व!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.