राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या हिंदुत्वावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी 14 मे रोजी घेतलेल्या सभेचा खरपूस समाचार घेतला. तुमचं हिंदुत्व खरं, की आमचं हिंदुत्व खरं असं मुख्यमंत्र्यांनी त्या सभेत म्हटलं. यावरुन तुम्ही काय वॉशिंग पावडर विकताय का?, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
काय पोरकटपणा चालवला आहे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी आमचं हिंदुत्व खरं असल्याचा प्रचार शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यावरुन राज ठाकरे यांनी टीका केली. हा प्रकार म्हणजे तुमचे कपडे शुभ्र की आमचे कपडे शुभ्र म्हणण्यासारखा आहे. हे करायला तुम्ही काय वॉशिंग पावडर विकताय का?, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लगावला आहे.
(हेही वाचाः भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी राज ठाकरेंनी असं काही केलं, ज्याने…)
यांचं हिंदुत्व पकपक करणारं
ज्या राणा दाम्पत्याला मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यावरुन शिवसेनेने विरोध केला. त्यांच्याच सोबत शिवसेनेचे नेते लडाखमध्ये गप्पा मारतात. त्यामुळे यांचं हिंदुत्व हे केवळ पकपक करणारं असल्याचा टोला राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
(हेही वाचाः ‘नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्रायव्हर से कहा’, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा)
Join Our WhatsApp Community