मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पण राज्यातील या संपूर्ण सत्तासंघर्षावर टीका होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात चाललेलं राजकारण हे खरं नसून ताी सत्तेची अॅडजस्टमेंट असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही
गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात जे राजकारण चालू आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही. ज्या मतदाराने 2019 च्या निवडणुकीत मतदान केले आहे त्याला कळतही नसेल की आम्ही मतदान कोणाला केले आहे. कोण-कोणात मिसळलंय आणि कोण-कोणापासून लांब गेलंय हे कळतंही नाही. हे खरं राजकारण नाही. ही सत्तेची तात्पुरती अॅडजस्टमेंट आहे. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
(हेही वाचाः राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी शिंदे-फडणवीस सरकारची यादी तयार?शिंदे गटातून यांना मिळणार संधी)
मी बंड केलं नाही
अलीकडे माझ्या मुलाखतीत मुलाखतकारांनी मला नारायण राणे,छगन भुजबळ,एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी बंड केल्याचं म्हटलं.पण मी बंड केलं नव्हतं. हे सगळेजण गेले ते एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले.पण राज ठाकरेने बाळासाहेबांना भेटून शिवसेना सोडली होती, असे सांगत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
Join Our WhatsApp Community