उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचे नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशातच राजकीय वर्तुळातून अनेक नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यानंतर घडलेल्या घडामोडींवर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी भाष्य केले आहे. राज ठाकरेंची ही पहिली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंचं पहिलं ट्विट )
काय म्हणाले राज ठाकरे
एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होता, असे म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधल्याचे दिसतेय.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
गेल्या काही दिवस सुरू असलेल्या राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. या राजकीय भूकंपावेळी राज ठाकरे हे रूग्णालयात दाखल होते. त्याच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. यादरम्यान राज्यातील घडामोडींना वेग आला असताना त्यांना लिलावतीमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. रूग्णालयातून परत आल्यानंतर राज ठाकरेंनी सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेवर कोणतेच भाष्य केले नव्हते. अखेर आज त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचे पाहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community