मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी आपल्या पक्षाच्या पारंपारिक गुढी पाडवा मेळाव्याला हिंदुत्ववादी (Hindutva) भाजपा (BJP) आणि भाजपाचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. ठाकरे यांच्या साधारण ५५ मिनिटांच्या तडाखेबंद भाषणात एकदाही शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी इतकेच काय एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे नाव आले नाही. ठाकरे यांनी नव्या पिढीला धर्म जोपासा पण पण उंबराठ्याच्या आत, असा संदेश देत निसर्गाच्या आड धर्म येता कामा नये, असे मत व्यक्त केले.
शेतकरी, औरंगजेब, वचन संस्कृती
मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांनी भाजपा किंवा कोणत्याही अन्य नेत्याचे नाव न घेता अप्रत्यक्ष आसूड ओढले. प्रदूषित नद्या, जंगल, झाडे वाचवा, रोजगार निर्मिती, शेतकरी आत्महत्या, जाती-भेद, शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहिण, औरंगजेब इथपासून ते वाचन संस्कृतीपर्यंत ठाकरे यांनी परखड मते व्यक्त केली.
(हेही वाचा – औरंगजेबाची फक्त कबर ठेवा आणि तिथे बोर्ड लिहा की…; Raj Thackeray यांनी मांडली स्पष्ट भूमिका)
ठाकरे यांच्या वर्मी घाव
गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांच्या भूमिकेवर भाजपाने तीव्र आक्षेप नोंदवल्याने ठाकरे यांच्या निशाण्यावार भाजपा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष, मंत्री आशिष शेलार होते, मात्र भाजपावर उघडपणे टीका न करता सामाजिक भावनेतून ठाकरे यांनी भाजपाला सुनावले.
काय म्हणाले शेलार?
काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभामेळयातील गंगाजल कसे अशुद्ध आहे, यावर उघड टिप्पणी केली होती. तसेच ‘एक खोक्या काय घेऊन बसलात, सगळे खोक्याभाई विधानसभेत बसलेत’ अशा शब्दांत ठाकरे यांनी आमदारांवर टीका केली. यावरून आशिष शेलार यांनी ठाकरे यांच्या वर्मी घाव घालणारी प्रतिक्रिया दिली आणि शेलार मनसेच्या निशाण्यावर आले. ‘मतदार ज्यांना निवडून देत नाहीत किंवा जे निवडून येत नाहीत, अशा व्यक्ती विधानसभेत जाण्याऐवजी विधाने करणाऱ्या कार्यक्रमात दिसतात,’ असे प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना दिले.
(हेही वाचा – Himachal Landslide : हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे ३ महिलांसह ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी)
टीका जिव्हारी का लागली?
मे २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही जागा न मागता भाजपाला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यानंतर सहा महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुक झाली. त्यावेळी भाजपाने दादर भागात राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना पाठिंबा जाहीर करूनही अमित ठाकरे यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे राज्यात एकही जागा निवडून आली नसल्याने राज यांना शेलार यांची टीका जिव्हारी लागली, असे सांगण्यात आले. यातूनच राज ठाकरे यांनी भाजपा आणि आशिष शेलार यांना टार्गेट केले, अशी चर्चा सुरू झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community