मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे यांचे संध्याकाळी 5च्या सुमारास औरंगाबादमध्ये आगमन झाले. यावेळी मनसे सैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पण औरंगाबादच्या क्रांती चौकात राज ठाकरे रस्ता चुकले आणि नंतर त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागले.
काय झाले नेमके?
औरंगाबाद येथील बाबा पेट्रोल पंपावरुन राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा क्रांती चौकात दाखल झाला. या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज ठाकरे यांनी अभिवादन केले. त्यानंतर आपल्या नियोजित दौ-यानुसार त्यांना हॉटेल रामामध्ये जायचे होते. पण क्रांती चौकातून त्यांची गाडी पुन्हा एकदा बाबा पेट्रोल पंपाच्या दिशेने गेली. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांचा ताफा पुन्हा एकदा चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या बाजूने एसएससी बोर्डाकडे गेली आणि तिथून पुन्हा क्रांती चौकात आली. त्यावेळी राज ठाकरेंना ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागले. काही काळानंतर त्यांची गाडी ट्रॅफिकमधून हॉटेलच्या दिशेने रवाना झाली.
(हेही वाचाः आता माझा पक्षाशी संबंध नाही, शर्मिला ठाकरेंनी राज ठाकरेंना असं का सांगितलं?)
अमित ठाकरेही चुकले रस्ता
राज ठाकरे यांच्या सभेच्या तयारीसाठी शुक्रवारी मनसे नेत्यांसोबत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे औरंगाबाद येथे पोहोचले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मनसे सैनिक मोठ्या संख्येने बाबा पेट्रोल पंप परिसरात उपस्थित होते. पण गुगल मॅपमुळे अमित ठाकरे रस्ता चुकले आणि त्यांची गाडी थेट हॉटेलच्या दिशेने रवाना झाली.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात)
Join Our WhatsApp Community