मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौ-याची सध्या राज्यभर चर्चा आहे. 21 मे रोजी पुण्यात त्यांची सभा होणार होती. पण ही सभा आता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पावसाच्या शक्यतेमुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता राज ठाकरे हे पुन्हा मुंबईसाठी रवाना झाल्याचे समजत आहे.
सभा होणार का?
21 मे रोजी पुण्यात नदीपात्रात होणारी सभा ही खराब हवामानाच्या कारणाने रद्द करण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज घेत 21 मे रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याने ही सभा रद्द करण्यात आली आहे. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द करण्याचं पत्रही देण्यात आलं आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा 5 जून रोजी होणार आहे. त्यामुळे या दौ-याआधी राज ठाकरे आता सभा घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः राऊतांचा अग्रलेख वाचा… मग तुमच्यातील ‘सय्यद’ बंड करेल, आता मनसेचे ‘रोखठोक’)
राज ठाकरेंचा झंझावात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून पुणे दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या पदाधिका-यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उचलत आपला झंझावात सुरू ठेवला आहे. शिवतीर्थ, ठाणे, औरंगाबाद याठिकाणी राज ठाकरेंच्या जंगी सभा झाल्यानंतर त्यांनी आता सभांचा तडाखा लावल्याचे चित्र दिसत आहे.
Join Our WhatsApp Community