मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील हाय व्होल्टेज सभेची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सभेला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. राज ठाकरे आता काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष असताना राज ठाकरेंनी जे काही केलं त्याने सगळ्यांनीच राज ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार केला.
राज ठाकरेंनी अंध मुलांना दिली मंचावर जागा
राज ठाकरे यांना सभेच्या आधी सभागृहात काही अंध मूलं असल्याचे कळले. तेव्हा भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्या सर्व अंध मुलांना मंचावर घेऊन यायला सांगितले. आणि त्या सर्व मुलांना मनसेच्या पदाधिका-यांसोबत राज ठाकरे यांनी खुर्चीवर बसायला जागा दिली.
(हेही वाचाः ‘नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्रायव्हर से कहा’, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा)
मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलं
स्वतः नितीन देसाई, बाळा नांदगांवकर यांसारख्या मनसेच्या मोठ्या नेत्यांनी देखील या मुलांना जागा देण्यासाठी आपल्या खुर्च्या पुढे केल्या. मनसेच्या सभेमध्ये पहिल्यांदाच हा प्रकार घडत असल्याचे सर्वांनी पाहिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत मंचावर कायमच मनसेच्या नेत्यांना स्थान देण्यात येते. पण यावेळी राज ठाकरे यांनी ही कृती करुन त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या या कृतीमुळे उपस्थित सर्व मनसैनिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवत राज ठाकरेंच्या नावाचा जयजयकार केला.
Join Our WhatsApp Community