रेल्वेने विदर्भ दौऱ्यावर जाणारे राज ठाकरे म्हणतात, ‘काही डबे जोडण्याचे काम सुरु आहे’

147

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे १७ सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी ते चक्क रेल्वेने प्रवास करणार आहेत. त्याविषयी पत्रकारांनी राज ठाकरेंना विचारताना, ‘तुम्ही रेल्वेने नागपूरला का जात आहात’, असे विचारले असता ‘सध्या काही डबे जोडण्याचे काम सुरु आहे’, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर युतीवर चर्चा 

राज ठाकरे या दौऱ्यात नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीला जाऊन चाचपणी करणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मुंबईत १३५ ते १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर शिंदे गटासाठी ८० ते ९० जागा सोडल्या जाणार आहेत. येत्या २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या कायदेशीर लढाईचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर युतीसंदर्भातील हालचालींना आणखी वेग येऊ शकतो. मात्र, मुंबईतील निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसेने एकत्र येऊन शिवसेनेला शह देण्याची रणनीती आखली आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. राज ठाकरे नागपूरमध्ये असताना भाजपचे प्रमुख नेते त्यांच्याशी संवाद साधतात का, हे पाहावे लागेल.

(हेही वाचा काँग्रेसची भारत जोडो यात्रा नाही, तर आग लगाओ यात्रा! संघाच्या गणवेशाचा अवमान, भाजपाचा पलटवार (

राज ठाकरेंचा विदर्भ दौरा कधीपासून?

पक्षबांधणी करण्यासाठी राज ठाकरेंनी १७ सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौरा हाती घेतला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती गाठून राज ठाकरे चाचपणी करणार आहेत. १७ आणि १८ सप्टेंबरला राज विदर्भात येतील. त्यांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी मनसेचे प्रवक्ते माजी नगरसेवक संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अगोदरच चार दिवस नागपुरात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.