थांब जरा… म्हणत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्याच्या खांद्याला लावलं मलम!

110

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कायम त्यांच्या बेधडक भाषण आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या बिनधास्त आणि रोखठोकपणामुळे समस्त तरूण मंडळी तर त्यांचे चाहते आहेत. मात्र सध्या राज ठाकरे त्यांच्या कोणत्या वक्तव्याने किंवा भाषणाने चर्चेत नाही तर वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. ते कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कार्यकर्त्याला मलम लावतानाचा एक व्हिडीओ.

…म्हणून राज आले चर्चेत

मनसे नेते अविनाश जाधव यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरे चक्क मनसेच्या एका कार्यकर्त्याच्या खांद्याला मलम लावताना दिसत आहेत. राज ठाकरे कार्यकर्त्याला मलम चोळतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, आतापर्यंत अनेकांनी तो पाहिलाय तर त्याचे कौतुकही केले आहे. असे सांगितले जात आहे की, राज ठाकरे यांच्या मुंबईतील नव्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान हा किस्सा घडला आहे.

बघा व्हिडिओ

नेमकं काय आहे प्रकरण

साहेब आज हात खूप दुखतोय, असं म्हटल्यानंतर मनसेच्या मनोज चव्हाण यांना राज ठाकरेंनी थांब जरा असे म्हटले. राज ठाकरेंना राहावलं नाही. त्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः मनोज चव्हाण यांच्या खांद्याला मलम लावून दिलं आहे. त्यांनी मनोज चव्हाण यांना मलम लावून देत कार्यकर्त्याची काळजी घेतली. मनोज चव्हाण यांना मलम लावतानाचा हा व्हिडिओ ठाणे-पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.

(हेही वाचा – राज्यातील २५ हजार महिला गायब, चित्रा वाघ आक्रमक! म्हणाल्या, “माता-भगिनींचं रक्षण करू न शकणारं सरकार…”)

…म्हणून मी राज ठाकरेंना दैवत म्हणतो

हा व्हिडिओ शेअर करत फेसबुकवर अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना दैवत म्हटले आहे. सोबत त्यांना मी दैवत का म्हणतो, याबाबतचा खुलासा व्हिडिओत दिल्याचे अविनाश जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.