मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. औरंगाबादच्या सभेतील राज ठाकरेंच्या विधानांमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याचं दिलेलं अल्टिमेटम संपल्यामुळे बुधवारी राज्यात काही ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जूना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनीही भोंग्यांचा मुद्दा उचलून धरल्याचे दिसत आहे.
(हेही वाचाः बाळासाहेबांनी घडवलेल्या ‘त्या’ इतिहासाची पुनरावृत्ती राज ठाकरे करणार, मनसेचा दावा)
काय म्हणाले होते बाळासाहेब?
ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यादिवशी रस्त्यावरचे नमाज आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. धर्म असा असावा लागतो की जो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये, लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा जर कोणाला उपद्रव होत असेल त्यांनी मला होऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदींवरचे लाऊडस्पीकर खाली येतील, असे बाळासाहेबांनी आपल्या भाषणात म्हटल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे आता बाळासाहेबांच्याच विचारांचा पुनरुच्चार राज ठाकरे करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या अटकेचा मनसेला ‘असा’ झाला होता फायदा)
राज ठाकरेंचे पत्र
मशिदींवरचे भोंगे 4 मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितले होते. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.
(हेही वाचाः आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्रास काय होतो ते त्यांनाही समजू दे- राज ठाकरे)
Join Our WhatsApp Community