राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचे एका पेक्षा एक ‘टीझर’, फक्त एका क्लिकवर

79

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. या सभेसाठी मनसेकडून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ, ठाणे आणि औरंगाबादच्या सभांच्या टीझर प्रमाणेच आता मनसेकडून राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेसाठी एका पेक्षा एक टीझर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत.

राज ठाकरे यांची 22 मे रोजी सकाळी 10 वाजता पुण्यातील स्वारगेट येथे असलेल्या गणेश कला क्रीडा मंच येथे सभा संपन्न होणार आहे. त्यासाठी मनसैनिकांना आवाहन करण्यात येत आहे.

(हेही वाचाः केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची ‘ओला’, ‘उबर’ टॅक्सी कंपन्यांना नोटीस)

मला बाण काढायला लावू नका

मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ, ठाणे आणि औरंगाबादमधील सभेतील भाषणांचे मुद्दे शेअर करण्यात आले आहेत. मी अजून माझ्या भात्यातील बाण काढलेला नाही, तो मला काढायला लावू नका, असा इशारा राज ठाकरेंनी दिल्याचे पहायला मिळत आहे.

राजगर्जना ऐकायला नक्की या

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील एक टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये राजगर्जना ऐकायला नक्की या, असे आवाहन मनसैनिकांना करण्यात आले आहे. गुढीपाडवा मेळाव्यातील राजगर्जनेनं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते सैरभैर होऊन वाट्टेल तसं, वाट्टेल ते बरळू लागले, मग त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्यातील उत्तरसभा पार पडली, मग अनधिकृत भोंगे आणि त्या भोंग्यांचा माज उतरवण्यासाठी संभाजीनगरची प्रचंड सभा आणि आता फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी, पुणे, अशी पोस्ट राजू पाटील यांनी शेअर केली आहे.

(हेही वाचाः पुण्यात सर्वांचा चोख हिशोब होणार, ‘मनसे’चा इशारा!)

करारा जवाब मिलेगा

राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून विरोध करण्यात येत आहे. त्यावरुन आता मनसेकडून करारा जवाब मिलेगा असं म्हणत एक टीझर बनवण्यात आला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या सभेत बृजभूषण सिंह यांना उत्तर देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.