मनसे इफेक्ट: राज्यात ‘या’ ठिकाणी भोंग्यांविनाच अजान, अशी आहे स्थिती

157

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत दिलेल्या इशा-यानंतर बुधवारी एक पत्रक जारी करत, भोंग्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमिवर 4 मे बुधवारपासून मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ज्या मशिंदींमध्ये भोंग्यावर अजान दिली जात आहे, तिथे मनसैनिक हनुमान चालिसा लावत आहेत. तसेच, अनेक ठिकाणी मशिदींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सचे पालन करत, भोंग्यांविनाच अजान झाल्याचे पाहायला मिळाले.

या ठिकाणी भोंग्यांविनाच अजान

मुंब्रा येथील दारुफाला मस्जिदमध्ये भोंग्याविना अजान झाली. तसेच, वांद्र्यातील जामा मशिद आणि भिवंडीमधील पडघा या मशिदीमध्येही भोंग्यांविनाच अजान झाली. मालेगाव मशिदींमध्येही भोंग्यांविनाच अजान झाली. मुस्लिम बहुल मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा सतर्क आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी या भागात तळ ठोकून बसले आहेत.

अजानवेळी कांदिवलीत हनुमान चालिसेचे पठण

कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभेच्या संजय नगरमध्ये मनसेतर्फे अजानच्यावेळी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 4 मे बुधवारचा आहे. संजय गांधी नगर, गांधी नगर येथील मशिदीतून अजनाच्यावेळी हा व्हिडीओ बनवण्यात आला होता.

( हेही वाचा: आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्रास काय होतो ते त्यांनाही समजू दे- राज ठाकरे )

हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला

नाशिकमध्ये मनसैनिकांकडून हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जुने नाशिक परिसरातील जबरेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. स्पीकर, वायर आणि इतर साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.