सभा होणारच! राज ठाकरे गुरुवारी जाहीर करणार तारीख

88

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून पुणे दौ-यावर आहेत. त्यांची 21 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार होती. पण ती पावसाच्या कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. पण आता ही सभा पुढच्या आठवड्यात होणार असल्याचे मनसेच्या पदाधिका-यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी जाहीर करणार तारीख

राज ठाकरे यांची बुधवारी पुण्यातील मनसे पदाधिका-यांसोबत बैठक पार पडली आहे. या तारखेनंतर राज ठाकरे गुरुवारी आपल्या सभेची नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे मनसेच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात येत आहे. पण पुढील आठवड्यात ही सभा होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास सभेचे ठिकाण आणि तारीख आणि वेळ जाहीर करणार आहेत. सभेसाठी काही ठिकाणी पोलिसांकडून परवानगी देण्यात आल्याचेही मनसेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता पुण्यावरुन मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

राज ठाकरेंचा झंझावात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून पुणे दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या पदाधिका-यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उचलत आपला झंझावात सुरू ठेवला आहे. शिवतीर्थ, ठाणे, औरंगाबाद याठिकाणी राज ठाकरेंच्या जंगी सभा झाल्यानंतर त्यांनी आता सभांचा तडाखा लावल्याचे चित्र दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.