मनसेने राज्य सरकारची बंदी झुगारून दहीहंडी साजरी केली, त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम तोडून दहीहंडी फोडून दाखवली, हे काय स्वातंत्र्ययुद्ध होते का, असे सुनावले. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी प्लेगच्या साथीच्या वेळी अत्याचार करणाऱ्या कमिशन चार्ल्स रँडची उपमा मुख्यमंत्र्यांना देऊन शिवसेना-मनसे यांच्यात ‘स्वातंत्र्य’ युद्ध सुरु झाले आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
‘प्लेग’ची साथ आहे, या नावावर १८९७ साली रँड ने जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चाफेकर बंधूनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँड ला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित.
प्लेग ची साथ आहे या नावावर 1897 साली रँड ने जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चाफेकर बंधूनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँड ला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 1, 2021
का म्हणाले देशपांडे मुख्यमंत्र्यांना रँड?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन दहीहंडी साजरी करण्यावर निर्बंध घातला होता. त्याला मनसेने मात्र विरोध केला, त्यानुसार मनसेच्या नेत्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी सरकारचा निषेध करीत दहीहंडी साजरी केली. त्यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मनसेला चांगलेच सुनावले. काही जणांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही, नियम तोडून दहीहंडी साजरी केली, हा काय स्वातंत्र्य लढा होता का, लढायची इतकीच खुमखुमी असेल तर कोरून विषाणूच्या विरोधात लढा. अशा प्रक्रारे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला थेट स्वातंत्र्य लढ्याचा संदर्भ दिला. त्यामुळे आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर उत्तर देताना स्वातंत्र्य लढ्याचा संदर्भ देत प्लेग ची साथ आणि त्यावेळी अत्याचार केलेल्या कमिशनर चार्ल्स रँडची आठवण करून दिली आहे.
Join Our WhatsApp Community